मुंबई – अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सतत चर्चेत असतात. आपल्या कामातून असो वा… लोकांच्या मदतीला धावून जाणे असो… एक लोप्रतिनिधी म्हणून डॉ. सुजय विखे पाटील हे नेहमी तत्पर असतात. आपल्या मतदार संघातील अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी नेहमीच धावून जातात.
पण दुसऱ्या शहरात तेही मुंबईसारख्या बाहेरच्या मतदारसंख्यात एक लोकप्रतिनिधी कुणाच्या मदतीला धावून जाणे हे विरळच.. असाच काहीसा प्रकार अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत घडला आहे. आणि त्यांच्या या कामाचे आता सगळीकडे कौतुक देखील होताना दिसून येत आहे.
झालं असं की.., डॉ. सुजय विखे पाटील काल रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य आपल्या मोबाईल मध्ये शुट केली आणि सोशल मीडियात पोस्ट केली. केतन भोई या कल्याणमध्ये राहणाऱ्या अभियंत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात झालेले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. आणि त्यांच्या या कामाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सध्या ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे.
केतन आपल्या पोस्टमध्ये लिहतो…
“आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे तीन लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत.
पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला. असे खासदार सर्वांना मिळो..!!’