अयोध्येत राम मंदिर बांधायला सोन्याची वीट दान देऊ

बाबरचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांचा मानस
नवी दिल्ली : देशात मागच्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या संवेदनशील अयोध्या राम मंदीरच्या मुद्यावर तोडगा निघत नाही. त्यातच सर्वोच्च न्यायालयात याविषयी रोज सुनावणी करण्यात येत आहे. दरम्यान, आता या सगळ्यात खुप महत्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे खुद्द बाबरच्या वंशजांनीच अयोध्येत राम मंदीर बांधले जावे अशी इच्छा व्यक्‍त केली आहे.

शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी ही इच्छा जाहीर केली आहे. जर राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल. शिवाय राम मंदिर बांधायला सोन्याची वीट दान देऊ, असे तुसी म्हणाले आहेत.  अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वादावर आपले मत मांडण्याची याचिका नुकतीच तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. हैदराबादमध्ये राहणारे मुघल राजघराण्याचे वंशज तुसी यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जागा द्यावी अशी विनंती केली आहे. कोणाकडेही अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत. पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे. न्यायालयाने जर मला तशी परवानगी दिली तर अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन असेही तुसी म्हणाले आहेत. यापूर्वीही असा प्रस्ताव तुसी यांनी ठेवला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×