Devendra Fadnavis | आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. राज्यभरातून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहकुटूंबासोबत सागर बंगल्यावरील निवासस्थानमधील गणपतीचे विसर्जन केले.
सागर बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही आज आमच्या निवासस्थानी गणेश विसर्जन केले. लोकांनी हा सण उत्साहात साजरा करावा आणि कायदा व सुव्यवस्था राखत विसर्जनही त्याच पद्धतीने होईल, अशी मला आशा आहे. ”
Devendra Fadnavis
#WATCH | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, “We did Ganesh visarjan at our residence today. I am hopeful that people celebrated this festival with enthusiasm and immersion will also be done in the same manner while maintaining law & order.” pic.twitter.com/Js57PhAh4b
— ANI (@ANI) September 17, 2024
पुढे ते म्हणाले, “गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी,” असा टोला फडणवीसांंनी विरोधकांना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी भाजपचे केंद्रीय अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असे अनेक राजकीय नेते मंडळी आले होते.
Devendra Fadnavis