दुबई -ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, पण सामन्यातील परिस्थितीचे भान ठेवून तारतम्य बाळगून खेळ करण्याची त्याची वृत्ती नाही, अशा शब्दांत भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने मॅक्सवेलच्या कामगिरीचे समीक्षण केले आहे.
रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांमध्ये सामना झाला. गेल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ या सामन्यात जोरदार पुनरागमन करणार असा अंदाज व्यक्तकेला होता. परंतु मुंबई इंडियन्स संघाच्या फ्लॉप फलंदाजीने आणि ग्लेन मॅक्सवेलच्या घणाघाती फलंदाजीमुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.
मॅक्सवेलने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर सेहवागने आपले मत व्यक्तकेले. अर्थात, मॅक्सवेलवर सेहवागने केलेली टीका नवीन नाही. जेव्हा मॅक्सवेल दिल्ली संघासाठी खेळायचा त्यावेळीदेखील अनेकदा सेहवागने त्याच्यावर टीका केली होती.
मी त्याच्या विरोधात नाही, पण तो ज्या पद्धतीने खेळतो त्याच्या विरोधात आहे. तो एक चांगला खेळाडू आहे, परंतु तो अनेकदा परिस्थितीनुसार खेळत नाही, असेही सेहवाग म्हणाला.