सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सनम तेरी कसम’चा बोलबाला आहे. दरम्यान, चाहते त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा यापूर्वीच झाली आहे. दुसऱ्या भागातही पहिल्या भागात असलेला मुख्य अभिनेता हर्षवर्धन राणे दिसणार आहे. पण, मुख्य अभिनेत्री म्हणून दिसलेली मावरा हुसैन या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन हिने तिचे मत व्यक्त केले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री मावरा हिने सरूचीच भूमिका साकारली होती. जर माझ्यासाठी सीक्वलचा भाग बनणे शक्य असेल, तर मला त्याचा भाग बनायला नक्कीच आवडेल, पण ते शक्य नसले तरी मला वाईट वाटणार नाही. ‘कनेक्ट सिने’ला दिलेल्या मुलाखतीत मावराने आपले मत व्यक्त केले. सनम तेरी कसम हा चित्रपट थिएटर्समध्ये पुन्हा रि-रीलज करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याबद्दल मावराने चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सनम तेरी कसम चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले होते.
बॅाक्स अॅाफिसवर तगडी कमाई
2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा रि-रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. रि-रिलीजमध्ये, चित्रपटाला मूळ रिलीजच्या तुलनेत दुप्पट प्रेम मिळाले आहे. यामुळे चित्रपटाचे स्टार्स आणि निर्माता-दिग्दर्शक खूप खूश आहेत. 7 फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.