मावळ @83.40%

दहावीचा “ऑनलाइन रिझल्ट’ : यंदा निकाल 10 टक्‍क्‍यांनी घसरला

मावळ – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 8) ऑनलाइन जाहीर झाला. मावळ तालुक्‍यातील 76 शाळांमधील 83.40 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल 10 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारत 89.05 टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मावळातील यंदा पाच हजार 108 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी चार हजार 260 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्‍यातील 10 शाळांचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक शाळा तळेगाव दाभाडे परिसरातील आहेत. नव्वदपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या 17 शाळांचा समावेश आहे.

भेगडे स्कूलचे सलग तिसऱ्या वर्षी यश

तळेगाव दाभाडे :येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थांनी सलग तिसऱ्या वर्षी घवघवीत यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शाळेचा निकाल 100 टक्‍के लागला. शाळेची विद्यार्थिनी मयूरी दिलीप पाटील हिने 92.60 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर आदित्य कैलास पवार याने 91.80 टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. धनंजय संजय बोरसे याने 91 टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.  निकालानंतर या सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे विषय शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, गौरी काकडे यांनी अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.