कुसगाव बुद्रुक -महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 65 वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशन 2022 या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडण्यात येणार आहे. पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी मावळ तालुका कुस्तीगीर संघाची वरिष्ठ माती व गादी आणि कुमार व बाल गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा येत्या गुरुवारी (दि.1) काले येथे उभारण्यात आलेल्या नवीन कुस्ती आखाड्यात होणार आहे.
यावेळी काले येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कुस्ती आखाड्याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. कुस्तीगीरांची वजने स्पर्धेच्या दिवशी गुरुवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार असून, दुपारी दोन वाजता आखाड्याचे उद्घाटन व कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
कुस्ती स्पर्धेसाठी गटनिहाय वजन गट पुढील प्रमाणे- बालगट 14 वर्षाखालील – 25, 28, 32, 35, 38, 42 किलो. कुमार विभाग 17 वर्षाखालील – 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 किलो. वरिष्ठ माती व गादी विभाग – 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी (86 ते 125किलो).