पवनानगर – मावळ तालुक्यासह पवनमावळ परिसरात दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या वेळी वाऱ्याचा जोर मोठा होता. त्यामुळे येळसे येथील फूल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांच्या पॉलिहाउसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पॉलीहाऊसचे सांगाडे उरले आहेत; शेड उडून गेल्यामुळे झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रोडक्शन थांबले आहे, यामुळे उत्पादनात ही घट होणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवणे येथे घरावरील पत्रे उडून गेले आहे. पवन मावळ परिसरात अनेक ठिकाणी झाडेही उदमळून पडली आहे.
रविवारी (दि. 9) सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरात सलग 24 तास वीज गायब झाली होती. विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यामुळे बराच वेळ येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे पवन मावळ परिसरात भात शेतीच्या कामांना वेगाने सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.