अधिकारी मारहाणप्रकरण; पाच जणांना अटक

वडगाव मावळ – सहा महिन्यांपूर्वी टाकवे बुद्रुक (ता. मावळ) येथील “केएसपीजी’ कंपनीतील अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच आरोपींना अटक केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संतोष सुधाकर वाघ (वय 40, रा. सुंदर नगरी, कोथरूड, पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी रामदास हनुमंत दहिभाते (वय 25), संकेत भरत दहिभाते (वय 20), पांडुरंग मोतीराम दहिभाते (वय 19, तिघे रा. बेडसे ता. मावळ, अक्षय निवृत्ती खिरीड (वय 23, रा. बऊर ता.मावळ) व अमोल बाळू शेळके (वय 21, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे या गुन्ह्यातील अटक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील अविनाश रमेश साळवी (रा. लोखंडेवाडी, करुंज ता. मावळ) व अक्षय नामदेव राऊत रा. राऊत वाडी ता. मावळ) हे दोघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएसपीजी कंपनीच्या थर्ड शिफ्टदरम्यान स्टॅकींग केलेल्या बेअरींग प्रेस कामगार संतोषकुमार बसवणआप्पा करबष्टी (वय 27, रा. माळीनगर, वडगाव ता. मावळ) यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी ट्रॉलीमध्ये टाकून दिल्याने कंपनीच्या कामच वेळ वाया गेला. क्वॉलिटी प्रॉडक्‍शनचे नुकसान झाल्याची तक्रार फिर्यादी संतोष वाघ यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती.

याच रागातून युनियन अध्यक्ष विष्णू किसन लोखंडे यांनी कंपनीत दहशत ठेवण्यासाठी कामगार संतोषकुमार करदष्टी यांनी कामगाराच्या टोळक्‍याला चिथावणी देवून इंद्रायणी नदी पुलाजवळ मोटारीतून जात होते. हॉकी स्टीकने तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक जीवन राजगुरू यांनी केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.