माळवाडीतील स्वाती दाभाडे हिचा पार्थ पवार यांच्या हस्ते सत्कार

इंदोरी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या स्वाती किसन दाभाडे हिचा माळवाडी (ता. मावळ) येथे निवासस्थानी जावून पार्थ पवार यांनी सत्कार केला. या वेळी अनुसूचित जातीमध्ये राज्यसेवा परीक्षेत राज्यात दुसरी आलेल्या पूजा गायकवाड हिचाही सत्कार करण्यात आला.

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत पार्थ पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, लेखणी (पेन), शिवप्रतिमा देऊन स्वाती दाभाडे आणि पूजा गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी स्वाती दाभाडे हिचे वडील किसन दाभाडे, आई लक्ष्मीबाई दाभाडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटाकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी सरपंच चंद्रकांत दाभाडे, रुपाली दाभाडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.