मावळ : ‘महाराजस्व’मध्ये 4 हजार 923 नागरिकांना लाभ

समाधान मेळावा : नागरिकांचे समाधान हेच लोकप्रतिनिधींचे कार्य असल्याचे आमदार बाळा भेगडे यांचे मत

नाणे मावळ – महाराजस्व अभियान लाभ समाधान मेळावा नायगाव येथील हिरकणी मंगल कार्यालयात संपन्न झाला. मावळ तालुक्‍यातील सहा यशस्वी समाधान शिबिरानंतर सातवे खडकाळा मंडल विभागाचा समाधान मेळाव्यास आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी स्वतः प्रत्येक स्टॉलवर उभे राहून नागरिकांना मार्गदर्शन करून लाभ मिळवून दिला आहे. या शिबीरात दिवसभरात चार हजार 923 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आधार कार्ड (212), रहिवासी दाखले (872), तलाठी चौकशी अहवाल (577), नागरी सुविधा केंद्र उत्पन्न दाखले (100), प्रतिज्ञापत्र (127), मराठा व अन्य जात दाखले (160), अन्न व पुरवठा विभाग वाढीव अन्न सुरक्षा (88), नाव कमी करणे (305), नाव वाढवणे – 211, दुबार शिधापत्रिका (985), अपंग नोंदणी (42), संजय गांधी निराधार योजना वाटप (66), श्रावण बाळ योजना वाटप (35), रक्‍त तपासणी (160), माझी कन्या भाग्यश्री लाभ (4),तपासणी (10), मका बियाणे वाटप (70), प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन (2), कृषी यांत्रिक वाटप (21), उज्वला गॅस वाटप (15), बॅंक खाती उघडणे (28), प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा (35), खरेदी-विक्री संघाकडून ना-नफा ना-तोटा तत्वावर 60 पोती इंद्रायणी तांदूळाचे वाटप करण्यात आले.

अशा प्रकारे शासनाच्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ खडकाळा मंडळातील 4 हजार 195 नागरिकांना समाधान शिबिराच्या माध्यमातून आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी मिळवून दिला. या वेळी आमदार बाळा भेगडे, तहसीलदार रणजीत देसाई, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, मंडल अधिकारी एस. खोमणे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक गणपतराव सावंत, शंकरराव शिंदे, माजी सभापती गणेश गायकवाड, राजाराम शिंदे, संचालक माऊली शिंदे, नाणे मावळ भाजपचे अध्यक्ष विजयराव टाकवे, आदी पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किरण राक्षे यांनी केले. राजेश सातकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)