मावळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शच – म्हाळसकर

File photo

कार्ला – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भाजे येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की, शिक्षणाचे कितीही बाजारीकरण झाले तरी आदर्श विद्यार्थी जिल्हा परिषद शाळाच घडवत असते. जिल्हा परिषद शाळा डिजिटल होत आहेत. विद्यार्थी ही आता डिजिटल शिक्षण घेऊन प्रगत होत आहेत.

या वेळी गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी उपस्थित होते. तसेच युवा सरपंच चेतन मानकर, उपसरपंच दिनेश ढगे, सदस्य दिलीप भालेराव, मच्छिंद्र विखार, गोरक्षनाथ दळवी, आश्‍विनी खाटपे, सविता शिवेकर, पूनम शिवेकर, उल्हास वाशिवले, दिपक दळवी, उल्हास दळवी उपस्थित होते. प्रास्ताविक सुखदेव पथवे यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश ओहोळ यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)