मावळ : आरोग्य शिबिरात हेल्थकार्डचे वाटप

कामशेत – मोहितेवाडी येथे कामशेत येथील महावीर हॉस्पिटल व होरायझन क्‍लिनिक आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष सहकार्यातून 400 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले तसेच 200 नागरिकांना मोफत हेल्थकार्डचे वाटप करण्यात आले.

मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागातील गरीब व ज्येष्ठ नागरिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महावीर हॉस्पिटलचे संचालक विकेश मुथा यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्‌घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, मदन शेडगे, अंकुश सातकर, उमेश गावडे, गणेश भोकरे, डॉ. विकेश मुथा, डॉ. दिपक नरवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.