आंदर मावळातील मतदारांना दिली ‘व्हीव्हीपीएटी’ ची माहिती

टाकवे बुद्रुक  – मागील काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर राजकीय पक्षांकडून शंका घेतली जात असल्याने निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी याकरिता निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम बरोबरच आता वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रोल (व्हीव्हीपीएटी) मशीन आणण्यात आली आहे. या मशीनद्वारे मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्यांचे नाव त्याचा क्रमांक आणि त्याचे चिन्ह ही माहिती व्हीव्हीपीएटी या मशीनवर दिसणार आहे. त्याचे प्रात्याक्षिक बुधवारी आंदर मावळ भागातील गावामध्ये दाखविण्यात आले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ‘ईव्हीएम’मशीनबरोबर व्हीव्हीपीएटी मशीन वापरण्यात येणार आहे निवडणूक आयोगाच्या वतीने ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आंदर मावळ भागातील टाकवे, माऊ, वडेश्वर, भोयरे, भागात जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी टाकवे गाव कामगार तलाठी एस. ए. मलबारी, तांत्रिक कर्मचारी आर. डी. जगदाळे यांच्यासह टाकवे पोलिस पाटील अतुल असवले, उपसरपंच रोहिदास असवले, अविनाश असवले, काळुराम घोजगे, विकास असवले, मुनावर अत्तार, राम परदेशी, दत्तात्रय कुंभार, दशरथ कोठावळे आदींनी याठिकाणी उपस्थितीत राहुन व्हीव्हीपीएटी मशीन विषयी माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)