मावळ तालुक्‍याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी देणार : आमदार भेगडे

वडगाव मावळ  – मावळ तालुक्‍याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान दिली. मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून तसेच त्यांच्या निधीतून चांदखेड-सोमाटणे गटातील मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन गुरुवार (दि.24) रोजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, पंचायत समिती सदस्या निकित घोट्‌कुले, जिजाबाई पोटफोडे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, अजित आगळे, मावळ खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्ता केदारी, राजू सावळे, किरण राक्षे, नितीन घोट्‌कुले, सुमित्रा जाधव, एकनाथ पोटफोडे, संदीप येवेले, यादव सोरटे, तात्या गराडे, विठ्ठल सुतार, आदि पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रा.मा.130 ते उर्से आढे सडवली प्रजिमा 88, रस्ता 26 लाख रुपये, धामणे ते बेबडओहोळ रस्ता करणे 16 लाख रुपये, चांदखेड येथे बस थांबा बांधणे. 10 लाख रुपये, चांदखेड अंतर्गत रस्ता करणे. 3+2.30 लाख रुपये, चांदखेड जोडरस्त्यावर साकव बांधणे. 30 लाख रुपये, मौजे तनपुरे खिलारेवस्ती कुसगाव येथे साकव बांधणे. 20 लाख रुपये, बेबडओहोळ ते आढले बु.प्रजिमा 157 पर्यंत रस्ता करणे. 2 कामे 43 लाख रुपये, राजेवाडी ते दिवड रस्ता करणे. (इजिमा 66) 20 लाख रुपये, पुसाणे ते आढले खु. रस्ता करणे. (इजिमा 67) 26 लाख रुपये, पाचाणे फाटा ते पाचाणे गाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे.

25 लाख रुपये, पाचाणे फाटा ते पाचाणे गाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे. 54 लाख रुपये, घरकुल माथा येथे आढले रस्ता कॉंक्रीटीकरण करणे व शिवणे डोणे रस्ता करणे. इजिमा 51 लाख रुपये, आढले खु. ते पुसाणे रस्ता सुधारणा करणे. 29 लाख रुपये, या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)