मावळ : उमेदवारी कॉंग्रेसला मिळाल्यास भाजपचा पराभव अटळ – माऊली दाभाडे

पवनानगर – मावळ विधानसभेची उमेदवारी कॉंग्रेस पक्षाला दिली तर भाजप शंभर टक्के पराभूत होणार, असे मत माऊली दाभाडे यांनी जनसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी पवनानगर येथे व्यक्‍त केली. विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या वतीने जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाच्या समारोप प्रसंगी दाभाडे बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कार्याध्यक्ष खंडुजी तिकोणे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, गणेश काजळे, रोहिदास वाळुंज, भरत दळवी, सुदाम काळे, अशोक मावकर, विलास मालपोटे, वाघु दळवी, रामजी काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत सोमाटणे आढले, बेबेडओव्हळ ते उर्से आणि करूंज ते दुधीवरे असा गावोगाव जनसंपर्क अभियान राबविण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुसाठी कॉंग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभेत मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. गेली पंचवीस वर्षे मावळ तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत होत असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेंसला उमेदवारी न देता हा मतदार संघ कॉग्रेसला देण्यात यावा. आम्ही शंभर टक्के भाजपला पराभूत करू. असा विश्‍वास व्यक्‍त करताना दाभाडे यांनी भाजपसोबत आपला मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही कित्येक टीकास्त्रे सोडली. राष्ट्रवादी पक्षातील यादवीमुळे भाजपला सत्तेला लाभ मिळत आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्यासाठी सांगतात, असे गंभीर आरोपही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)