पवनानगर – दीड दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (दि. 2) पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने लोणावळ्यासह मावळाला दिवसभर झोडपले आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार पाऊस सुरू झाल्याने सर्वच धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोणावळ्यात आठ तासांत 87 तर पवना धरण पाणलोट क्षेत्रात 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणाचा जलसाठा 92 टक्के इतका झाला आहे.