बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल नागल-श्रद्धा आर्या यांचे लग्न झाले आहे. दुसरीकडे कतरिना-विकी कौशल, अंकिता लोखंडे-विकी जैन, सोनाक्षी सिन्हा-बंटी सचदेवा आदींचे लग्न ठरले आहे.
आता “नागिन’ फेम मौनी रॉयचेही लग्न ठरले असल्याचे समजते आहे. पुढच्या वर्षी बॅंक व्यवसायिक सूरज नांबियारबरोबर तिचे लग्न होणार असल्याचे समजते आहे. 27 जानेवारीला दुबई किंवा इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.
त्यानंतर पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मित्रमंडळींसाठी ग्रॅन्ड रिसेप्शन दिले जाणार आहे. मौनी आणि सूरजचे ऍरेंज मॅरेज आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मौनीच्या आईने सूरजच्या पालकांची भेट घेतली होती.
या कामी मंदिरा बेदीने मध्यस्थी केली असल्याचे समजते आहे. कारण मंदिरा बेदी ही मौनी रॉयची चांगली मैत्रीण आहे. या भेटीच्यावेळी मौनीचा भाऊदेखील उपस्थित होता. त्यानंतर काही महिन्यांनी मौनी रॉयने सूरज नांबियारबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. दोघांच्याही कुटुंबीयांबरोबरचाही एक फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच मौनीच्या लग्नाची चर्चा व्हायला लागली होती.