नवी दिल्ली – तबलिगी जमातच्या निझामुद्दीन प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना साद याची करोना चाचणी “निगेटिव्ह’ आल्याची बातमी मिळत आहे. मौलाना सादच्या वकिलांकडून कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. परंतु, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने मात्र अद्याप मौलाना सादशी संपर्क साधलेला नाही. क्राईम ब्रांचने मौलाना सादला नोटीस देऊन एम्स रुग्णालयात कोरोना चाचणी करून चाचणीचा अहवाल सोपविण्याचे निर्देश दिले होते.
कोणत्याही खासगी लॅबच्या अहवालावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, असे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मौलाना सादने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये अथवा आरएमएल किंवा सफदरजंग रुग्णालयात जाऊन चाचणी करवून घ्यावी आणि त्याचा रिपोर्ट सोपवावा, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. क्राईम ब्रांचकडून आत्तापर्यंत निझामुद्दीन प्रकरणाशी निगडीत 200 हून अधिक जणांनी चौकशी करण्यात आली आहे.