Maulana Kashif Ali Killed In Pakistan : पाकिस्तानात राहणारे दहशतवादी सध्या भीतीच्या छायेत जगत आहेत. हे वाचल्यानंतर मनात प्रश्न येणं साहजिक आहे की, दहशतवाद्यांचे मोठे केंद्र असलेल्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना भीतीच्या छायेखाली का जगावे लागत आहे? याचे कारण अज्ञात हल्लेखोर आहेत, जे गेल्या अडीच वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांना ठार करत आहेत.
वेळोवेळी हे अज्ञात हल्लेखोर पाकिस्तानात भारतविरोधी दहशतवाद्यांना ठार मारत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात राहणारे हे दहशतवादी चांगलेच घाबरले आहेत. एक काळ असा होता की पाकिस्तानात राहणारे हे दहशतवादी रॅली काढायला आणि भारताला धमक्या द्यायलाही मागे-पुढे पाहत नव्हते. आता परिस्थिती अशी आहे की हे दहशतवादी घरातून बाहेर पडायलाही घाबरत आहेत. आता भारताच्या आणखी एका शत्रू दहशतवाद्याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मौलाना काशिफ अली याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केलेय.
Founder member of Terrorist organisation Lashker-E-Taiba and brother in law of India’s most wanted terrorist Hafiz Saeed, Maulana Kashif Ali shot dead by UNKNOWN gunmen in Swabi, Pakistan.
Lashkar-e-Taiba requests Pakistan to arrest the ‘unknown gunmen’ pic.twitter.com/aogch4X0V7
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 17, 2025
घराबाहेर गोळ्या झाडल्या –
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि राजकीय प्रमुख मौलाना काशिफ अली याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशिफ अलीची खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात त्याच्याच घराबाहेर हत्या करण्यात आली. काशिफ अली हा पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग या राजकीय पक्षाचाही नेता होता. या पक्षाचा थेट लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी काशिफ अलीवर त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या. यानंतर अज्ञात हल्लेखोर तेथून पळून गेले.
काशिफ अली हा भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा मेहुणा होता –
काशिफ अली हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा होता. तर दुसरीकडे काशिफच्या हत्येमुळे पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांमध्ये गोंधळल्याचे वातावरण आहे. या अज्ञात हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी दहशतवादी संघटनेने पाकिस्तान सरकारकडे केली आहे.