“मट्टो की सायकल’चा प्रिमियर बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये

प्रकाश झा यांनी अभिनय केलेल्या “मट्टो की सायकल’चा वर्ल्ड प्रिमियर दक्षिण कोरियातल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 25 सप्टेंबरला होणार आहे.

सुधीर मिश्रा यांची निर्मिती आणि नवोदित दिग्दर्शक एम.गनी यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या “विंडो ऑन एशियन सिनेमा’या विभागात दाखवण्यात येणार आहे.

नवीन सायकल विकत घेण्यासाठी एका कुटुंबाने घेतलेले कष्ट आणि त्या सायकलवर ते कुटुंब कसे अवलंबून राहते, याची ही कथा आहे.
निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्या बरोबर अनिता चौधरी आणि आरोही शर्मा हे अन्य कलाकार असणार आहेत.

एका सर्वसामान्य कुटुंबातील पुरुषाच्या कथेवर विश्‍वास दाखवल्याबद्दल दिग्दर्शक गई यांनी झा यांचे अभार मानले आहेत. आपण प्रत्यक्षात कसे आहोत, त्याच्या अगदी विरुद्ध स्वरुपाची ही भूमिका असल्याचे झा यांनी सांगितले. या वर्षी करोनाच्या साथीमुळे बहुतेक महत्वाचे फिल्म फेस्टिव्हल रद्द झाले आहेत. केवळ बुसान आणि व्हेनिस येथील फिल्म फेस्टिव्हलच प्रत्यक्षात होणार आहेत. बुसान फेस्टिव्हल 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.