‘मातोश्री’ परिसर सील, परिसरातील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण

मुंबई-  कालानगर मधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचा परिसर मुंबई पालिकेकडून सील करण्यात आला आहे. या परिसरातील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले आहे.

या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मातोश्री बंगल्यात काम करणारे तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारी संरक्षण यंत्रणा यांची खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, त्या चहा विक्रेत्याकडे जाणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना तशी काही लक्षणं आढळली तर त्यांना लगेच क्वारंटाईन करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.