-->

व्हॉट्‌स ऍपवरून मटका जुगार

पिंपरी – पोलीस आयुक्‍तांच्या सूचनेनुसार पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे मटका जुगार खेळविणारे आता वेगवेगळ्या माध्यमातून हे अवैध धंदे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हॉट्‌स ऍपवरून मटका जुगार घेणाऱ्या अशाच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसानी अटक केली आहे.

दत्ता शिवलिंग कानडे (वय 36, रा. मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राकेश कदम (रा. काळेवाडी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक नामदेव राऊत यांनी रविवारी (दि. 24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी – चिखली रोडवर लालटोपीनगर येथे एका टपरी शेजारी दोघेजण व्हॉट्‌स ऍपवरून ऑनलाइन माध्यमातून मटका जुगार घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 हजार 700 रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल फोन असा एकूण 23 हजार 700 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.