मथुरेत ‘हेमा’ विरुद्ध ‘सपना’ सामना रंगणार ?

नवी दिल्ली – सपना चौधरी हे नाव भन्नाट डान्ससाठी कायम चर्चेत आहे. पण हरियाणाची ही नृत्यांगना सपना चौधरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी सपना चौधरी हे नाव डान्ससाठी नाही तर लोकसभा निवडणुकांसाठी चर्चेत आलं आहे. सपना चौधरी ही मथुरा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपने याआधीच हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे जर सपना चौधरी निवडणुकांच्या रिंगणात उतरली तर हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी अशी लढत होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे.

खरंतर, सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि लोकसभा निवडणुका लढणार या फक्त चर्चा आहेत. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती काँग्रेसकडून अथवा सपना चौधरीकडून देण्यात आलेली नाही.

सपना चौधरी मागच्या दीड महिन्यांपासून काँग्रेसच्या संपर्कात आहे. तसेच सपना उत्तर प्रदेशच्या मथुरेच्या जागेवरून लोकसभा लढणार असल्याचीही माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. जर सपना चौधरीला तिकीट मिळाले तर तिच्यात आणि प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यातील लढत पहायला मिळेल, आणि ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.