नदीला पूर आल्याने मठपिंप्रीकर बेजार

नगर  (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मठपिंप्री गावात श्री स्वामी चक्रधर यांचे मठ असून त्या मठात जाण्या येण्यासाठी सीना नदीच्या पात्रातुनच रस्ता आहे. मात्र तो सध्या पाण्याने पूर्ण भरलेला असल्यामुळे मठात राहणाऱ्या लोकांचा पूर्ण संपर्क तुटला असून शाळेतील विद्यार्थ्यांनाही शाळेत जायला अडचण येत आहे.

या दुषित पाण्यामुळे संपूर्ण गाव आजारांना बळी पडत आहे. सोबत शेतीचे ही नुकसान होऊ लागले आहे.
या रस्त्यावर लवकरच पूल बांधू असे अनेकदा अनेक पुढारी स्वामींच्या साक्षीने म्हटले मात्र आश्‍वासनांची पूर्ती या निवडणुकीत तरी होते का याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. या रस्त्यावर पूल व्हावा अशी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.