मुंबई – मध्य रेल्वेने माथेरान इथल्या माथेरान ते अमन लॉज दरम्यान धावणाऱ्या शटल रेल्वे सेवेच्या आणखी 4 फेऱ्या वाढवायचा निर्णय घेतला आहे.
या फेऱ्या येत्या 22 नोव्हेंबर सुरू राहतील असे मध्य रेल्वेने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यामार्गावर याआधीपासून 8 फेऱ्या सुरु होत्या. आता 4 फेऱ्यांची वाढ झाल्याने, या मार्गावरच्या अप आणि डाऊन मिळून रेल्वे फेऱ्यांची एकूण संख्या आता 12 झाली आहे.
दरम्यान प्रवाशांनी या रेल्वेतून प्रवास करताना, आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे.