कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान, माजी कर्णधार व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पेट्रन इम्रानखान यांनी मॅच फिक्सिंगबाबतच्या नव्या कायद्याला तत्वतः मंजुरी दिली आहे. यानुसार आता सर्व मंत्र्यांनी सहमती दर्शवली तर मॅचफिक्सिंग हा फौजदारी गुन्हा ठरणार असून पाकिस्तानातील कायदानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.
गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर अनेकदा मॅचफिक्सिंग झाल्याचे समोर येत आहे. त्यावर देशातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी मॅच फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा म्हणून गणला जावा, अशी मागणी केली होती.