‘मेट गाला २०१९’ : प्रियंका, दीपिका आणि ईशाचा हटके लूक पहिला का? 

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्टमध्ये संपन्न होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कॉस्टयूम पार्टीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. मेट गाला Met Gala 2019 इव्हेंटमध्ये  जगभरातील तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. यावर्षी मेट गालाची थीम ‘कैंप: नोट्स ऑन फैशन’ होती. या इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांनीही उपस्थिती लावली.

प्रियांका आणि निकचे हे  मेट गाला इव्हेंटमधलं तिसरं वर्ष आहे. प्रियांकानं यावेळी हटके लूक ट्राय केला. प्रसिद्ध कादंबरी ‘अॅलिस इन वंडरलँड’मधल्या रेड क्वीन या खलनायिकेपासून तिचा हा लूक प्रेरित होता. तर निक इटालियन माफिया लूकमध्ये प्रियांकासोबत आला होता. परंतु, प्रियंकाच्या हेअरस्टाईलने सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

https://www.instagram.com/p/BxI_limhYia/?utm_source=ig_web_copy_link

तर दीपिका पदुकोनने बार्बीसारखा गाउन परिधान केला होता.

https://www.instagram.com/p/BxJQ6jNgWwV/?utm_source=ig_web_copy_link

या इव्हेंटमध्ये ईशा अंबानीही उपस्थित लावली होती. अत्यंत सिम्पल लूकमध्ये ईशा या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.

https://www.instagram.com/p/BxJeAEzjF1w/?utm_source=ig_web_copy_link

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.