मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला अटक

चॅरटीच्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याप्रकरणी कारवाई

लाहोर : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक करण्यात आल्याचे पाकच्या माध्यमांनी सांगितले आहे.

दररम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वा पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद आणि त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक केल्याचे समजते. मात्र, मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यामुळे हाफिज सईदवरील कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.