नवी दिल्ली – जागतिक कार्ड पेमेन्ट कंपनी मास्टरकार्ड आगामी पाच वर्षांत भारतात 7 हजार कोटी रुपये गुंतविणार आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्याची संख्याही वाढणार आहे.
एवढीच गुंतवणूक कंपनीने मागील पाच वर्षांच्या कालावधीत कंपनीने केली आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेवर आमचा विश्वास वाढला आहे. तो आगामी काळातही वाढत राहावा यासाठी आम्ही आणखी गुंतवणूक करण्याचा विचार केल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. या गुंतवणुकीच्या आधारे भविष्यात कंपनी मास्टरकार्डच्या क्षमतेचा विस्तार करणे आणि नेटवर्क जागतिक पातळीवर उभारण्याची योजना तयार केली जाणार आहे.
भारतात आर्थिक टेक्नॉलॉजी क्षेत्रात होत असणारी वाढ समाधानकारक असून देशातील ग्राहक हे डिजिटल व्यवहाराला सध्या प्राधान्य देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. चालू वर्षांत फेब्रुवारीपर्यंत 99.06 कोटी कार्ड होते. यातील 4.6 कोटी क्रेडिट कार्ड आणि 94.5 कोटी डेबिट कार्ड असल्याची माहिती आरबीयच्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.