पुणे – बाणेर येथील रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही आग लागली.
याची माहिती मिळताच अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीत ५ चारचाकी वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.