प्रयागराजमधून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आले आहे. सिलिंडरच्या स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समजत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. ही आग प्रयागराजमधील शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.