मुंबई : मुंबईतील वर्सोवा भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे. आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत आहे.या होत असलेल्या स्फोटांनी परिसर चांगलाच हादरला आहे.
Mumbai: Four people injured in a cylinder blast at a cylinder storage godown on Yari Road in Andheri (W); all injured shifted to a city hospital
— ANI (@ANI) February 10, 2021
वर्सोवा परिसरातील यारी रोडवर आग लागल्याची घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच येथे अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
एकापाठोपाठ सिलेंडरचा भीषण स्फोट होत आहे. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहे. जखमींना कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच एक शाळा आणि हॉस्पिटल आहे. खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला आहे.