जळगाव : काही दिवसांपूर्वी जळगाव येथे कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काय घडले होते?
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेतील जखमींपैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
‘या’ तिघांचा मृत्यू
रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान शेजवळ अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.