साओ पावलो – गेल्या १८ वर्षांच्या काळात जगातील सर्वात मोठा जंगलप्रदेश असलेल्या अमेझॉनच्या (amazon rainforest) वनक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. स्पेन या देशाच्या आकारापेक्षा जास्त आकाराचे जंगल २००० ते २०१८ या कालावधीत नष्ट झाले आहे. अमेझॉनच्या (amazon rainforest) एकूण जंगल क्षेत्रापैकी तब्बल ८ टक्के जंगल नष्ट झाले आहे.
आर.ए.आय.एस.जि या पर्यावरणविषयक संस्थेने केलेल्या पहाणीप्रमाने २००० या नवीन शतकाला प्रारंभ झाल्यापासून ५१३०१६ चौरस किलोमीटरचे जंगल नष्ट झाले आहे. हा धोका येत्या काळात अधिकच वाढण्याची भीतीही या संशोधनात व्यक्त केली आहे.
या कालावधीत २००३ या वर्षात सर्वात जास्त म्हणजे ४९२४० चौरस किलोमीटर जंगल नष्ट झाले तर सर्वात कमी आकडा २०१० मध्ये १७६७४ चौरस किलोमीटर होता २०१२ नंतर जंगल नष्ट होण्याचा वेग अधिकच वाढला आहे.
इंधनासाठी झाडांची तोड ,शेती,खाणकाम पायाभूत सुविधांचे प्रकल्प या सर्व कारणांमुळे हे जंगल कमी झाले आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील,कोलंबिया,पेरू,बोलिव्हिया ,इक्वेडोर,व्हेनेझुला सुरिनाम आणि गयाना या देशांमधून अमेझॉनचे (amazon rainforest) जंगल जाते या जंगलाचा ६२ टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे.