नवी दिल्ली – करोनाच्या ओमायक्रॉन आवृत्ती सामुहिक संसर्गाच्या पातळीवर पोहोचली आहे. अनेक शहरात त्याच्या प्रसाराचा विलक्षण वेग पहायला मिळत आहे, असे सार्स- कोव्ह -2च्या जनुकीय मागोव्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “इन्साकोग’ या संस्थेने आपल्या साप्ताहिक निवेदनामध्ये नमूद केले
इन्साकोग ही संस्था केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त पुढाकारातून उभी करण्यता आली आहे. या संस्थेच्या 38 लॅबोरेटरीज्मधून करोनाच्या विषाणूंच्या जैविक संक्रमणावर लक्ष ठेवण्यात येते. जानेवारी दहाच्या मात्र रविवारी प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात ओमायक्रोनचे बहुतांश संसर्गित लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.
रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या आणि आयसीयुतील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जोखमीच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
करोना विषाणूच्या बी.1.640.2 या आवृत्तीच्या विषाणूची बारकाईने निरीक्षण करण्यात येत असून त्याची संसर्ग क्षमता वेगाने प्रसार करण्याची असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्याच्यात रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता असली तरी ती सध्या आपली चिंता नाही. त्या आवृत्तीच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे एकही देशात उदाहरण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.