मुंबई – चित्रपट आणि त्याबाबतचे वाद हे आपल्या देशाला काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी माहितीपट असलेल्या ‘काली’च्या पोस्टरवरून देशामध्ये मोठा वाद उफाळून आला होता. सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी मोहीम देखील सुरु केल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा एका चित्रपटाच्या पोस्टरवरून नवा वाद सुरु झाला आहे.’मासूम सवाल’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडसोबत भगवान श्रीकृष्णाचा फोटो दाखवण्यात आला आहे यामुळे आता सिनेसृष्टीत पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांचा मासूम सवाल नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठयावर आहे अशात याबाबतचा नवा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळते. चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्ण दाखवल्याने अनेकांनी सोशल मीडियावरून जोरदार विरोध दर्शवला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे रागातून अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
https://youtu.be/AmclO0UUcmU
समाजात कोणतेही तेढ निर्माण करण्याचा हेतू आमचा नसल्याचे मासूम सवाल या टीमने एका मुलाखतीत म्हंटले आहे. उलट या चित्रपटातुन आम्ही मोठी जनजागृती करत असल्याचे चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ ऑगस्टला रिलीज होतोय. जुलै महिन्यात याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.