मसुद अझरचा फास आवळला; पाकिस्तानने दिले मालमत्ता जप्तीचे आदेश

प्रवासासह शस्त्रे किंवा दारूगोळा खरेदी-विक्रीस बंदी

इस्लामाबाद: जैश ए महंमदचा प्रमुख मसूद अझर यांच्यावर संयुक्तराष्ट्रांकडून बंदी घातली जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अझरची पाकिस्तानातील मालमत्ता गोठवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून जारी करण्यात आला असून त्याच्यावर प्रवास बंदीही लागू करण्यात आली आहे. त्याला शस्त्रे किंवा दारूगोळा विकत घेण्यास अथवा विकण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने या संबंधात जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मसूद अझरच्या संबंधातील संयुक्तराष्ट्रांचा प्रस्ताव पुर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. या अध्यादेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करण्याचा आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अलकायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केले. जैशने काश्‍मीरमधील पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाच्या स्थितीपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मसूद विरोधात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमेरिका, यूके आणि फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावाला चीननेही पाठिंबा दिल्यानंतर अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसातच फ्रान्स, यूके आणि अमेरिकेने अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अलकायदा निर्बंध समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील 15 देशांमध्ये विटो अधिकार असलेला चीनने आपला विशेषधिकार वापरुन अझर विरोधातील प्रस्तावर रोखला होता. पण अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत चीनला माघार घ्यावी लागली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)