coronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य

वॉशिंग्टन  -करोना बाधितांची संख्या घटत असल्यामुळे आणि स्थिती आटोक्‍यात आल्यामुळे गेल्या काही काळात अमेरिकेने थोडे निर्बंध शिथिल केले होते. त्यात मास्कमधूनही तेथील नागरिकांची सशर्त सुटका झाली होती.

मात्र चीन पाठोपाठ आता त्या देशातही रूग्णांची संख्या वाढू लागल्याने अमेरिका सावध झाली आहे. अमेरिकेते एकाच दिवसात साठ हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाल्यामुळे तेथे धोक्‍याची घंटा वाजली आहे.

संसर्गाच्या दृष्टीने अतिधोकादायक असलेल्या भागांमध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमेरिकेतील सीडीसी या आजार नियंत्रण आणि प्रतिबंधक संस्थेचे महासंचालक रोशेल वेलेंस्की यांनी म्हटले की,

लस प्रभावी आहे. मात्र, करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा आणि इतरांचा आजारापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.