मास्क न लावल्यास येथे होते कठोर शिक्षा

नवी दिल्ली-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मास्क लावणे फार गरजेचे आहे. मात्र अजुनही अनेकजण मास्क लावताना दिसत नाही आहे. त्यामुळे अनेद देशांनी मास्क न लावणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा आहे. मात्र अरब देशात सरकारने मास्क न लावणाऱ्यासाठी कठाेर कारवाई करण्यात येत आहे.

कुवेत आणि कतारमध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलं नाही, तर अशा लोकांना तुरुंगवासाची शिक्षा तसंच त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घातल्यामुळे दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्यामुळे आपल्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. त्यात सोशल डिस्टंस, मास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे. जास्त खबरदारी घेण्याची सुद्धा गरज आहे. मात्र हे सगळं अजूनही अनेक देशांंमध्ये घडताना दिसत नाही आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.