अमान (जॉर्डन) – सूपरमॉम मेरी कोम व अव्वल खेळाडू अमित पंघल यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आगेकूच केली. यासह त्यांनी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला.
सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 52 किलो वजनी गटात अमितने फिलीपींसचा मुष्टियोध्दा कार्लो पालम याचा 4-1 असा पराभव केला. तर मेरी कोम हिने 51 किलो वजनी गटात फिलीपींसच्या आयरिश मैग्नो हिचा पराभव करत विजय नोंदविला.
Ticket to #Tokyo2020– 6⃣
No 1 seed, @Boxerpanghal is through to his first Olympics Games as he won his quarter-final bout against Filipino boxer, Carlo Paalam with a split decision. Way to go Amit. Incredible. ???#PunchMeinHaiDum#boxing#Olympics2020 pic.twitter.com/f9C6O5KsaH
— Boxing Federation (@BFI_official) March 9, 2020
दरम्यान, याआधीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 23 वर्षांच्या पंघलने मंगोलियाच्या एंकमनादाक खारखु याचा 3-2 असा पराभव केला होता. तर, मेरी कोमनेदेखील तडफदार खेळ करत न्यूझीलंडच्या तस्मिन बेन हिच्यावर 5-0 असा सहज विजय प्राप्त करत आगेकूच केली होती.