नवी दिल्ली – भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला 17 वर्षांत प्रथमच करोना व्हायरसमुळे तोट्याला सामोरे जावे लागले आहे.
पहिल्या तिमाहीत या कंपनीला 268 कोटी रुपयांचा तोटा झाला. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 1,376 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीची विक्री केवळ 3,679 कोटी रुपयांची झाली आहे. गेल्या वर्षी 18,738 कोटी रुपयांची विक्री झाली होती.
या तिमाहीत कंपनीला उत्पादन बंद ठेवावे लागले. त्याचबरोबर वाहनांची वाहतूक होण्यात अडथळे आले. या कारणामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. परिणामी कंपनीला तोटा झाला असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आता काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थितीत काही प्र्रमाणात सुधारणा होईल, असे कंपनीला वाटते.