Maruti Suzuki Dzire | भारतीय बाजारात सेडान सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची डिझायर कार सर्वात लोकप्रिय आहे. मागील 10 महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी या कारला खरेदी केले आहे. 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याविषयी सविस्तर जाणून घ्या.
Maruti Suzuki Dzire ची किंमत
Maruti Suzuki Dzire ची सुरुवाती किंमत 6.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप मॉडेलसाठी ग्राहकांना 10.14 लाख रुपये खर्च करावे लागतील.
Maruti Suzuki Dzire चे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स
Maruti Suzuki Dzire च्या एक्सटीरियरबद्दल सांगायचे तर यात एक मोठे फ्रंट ग्रिल, स्लिक एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प आणि नवीन 15 इंच ड्युअल टोन एलॉल व्हील देण्यात आले आहेत. कारमध्ये 9 इंच टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जर आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, ही भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट सेडान आहे, जी सिंगल-पॅन सनरूफमध्ये येते.
यामध्ये कंपनीने 1.2 लीटरचे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 81.58bhp पॉवर आणि 111.7Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार माइलेजसाठी लोकप्रिय आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार 24.79kmpl आणि ऑटोमेटिक गियरबॉक्ससह 25.71kmpl माइलेज देते.
कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही यात अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. यात 6 एअरबॅग्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात. ग्लोबल NCAP ने कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग दिली आहे.