मारुती कंपनीच्या 1279 गाड्यांत आढळली खराबी 

नवी दिल्ली: मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या 1279 नव्या स्विफ्ट आणि डिझायर गाड्यांतील एअर बॅग नियंत्रण यंत्रणेत खराबी आढळून आहे. या गाड्यात ही खराबी असण्याची शक्‍यता असल्याचे कंपनीला वाटते. या गाड्याची तपासणी करून त्यात जर खराबी असेल तर कंपनी आपल्या वितरकाच्या माध्यमातून या गाड्या विनामुल्य दुरुस्त करून देणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
यात 566 स्विफ्ट गाड्या तर 713 डिझायर गाड्या आहेत. या गाड्या 7 मे ते 5 जुलै 2018 या काळात तयार करण्यात आल्या आहेत. या अगोदर मे महिन्यातही कंपनीने 52668 गाड्यांबाबत अशी मोहीम राबविली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)