Maruti Alto K10 | भारतीय बाजारात एकापेक्षा एक शानदार कार उपलब्ध आहेत. असे असतानाही कमी किंमतीत येणाऱ्या Maruti Alto K10 ची लोकप्रियता कायम आहे. जानेवारी 2025 मध्ये या कारच्या 11,352 यूनिट्सची विक्री झाली आहे. Presso, Celerio आणि Jimny कारच्या तुलनेत ग्राहकांकडून 5 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे. कमी बजेटमध्ये येणाऱ्या या कारविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Maruti Alto K10 ची किंमत 4.09 लाख ते 6.05 लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे. ही हॅचबॅक STD, LXI, VXI आणि VXI Plus अशा चार व्हेरिएंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये येणाऱ्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात 1-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 67 PS पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहे.
कारमध्ये CNG पॉवरट्रेनचा पर्यायही उपलब्ध आहे, जो 57 PS पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करतो. यासोबत फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाते. मारुतीच्या गाडीमध्ये आयडल इंजिन स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानाची सुविधा मिळते.
कारचे पेट्रोल मॉडेल 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत 24.39 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत 24.90 kmpl पर्यंत मायलेज देते. तर, CNG मॉडेल 33.85 km/kg पर्यंतचे मायलेज देते.
Maruti Alto K10 चे स्पेसिफिकेशन्स
मारुती ऑल्टो K10 मध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, रिव्हर्स कॅमेरा, EBD सह ABS आणि रियर पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स मिळतात. या कारला तुम्ही स्पीडी ब्लू, अर्थ गोल्ड, सिजलिंग रेड, सिल्की व्हाइट, सॉलिड व्हाइट आणि ग्रेनाइट ग्रे रंगात खरेदी करू शकता.