कोपरगावच्या जवानाला वीर मरण

कोपरगाव तालुक्यात पसरली शोककळा

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवासी नायब सुभेदार सुनिल रावसाहेब वलटे (वय ४०) यांना मंगळवारी सीमेवर वीरमरण आले आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. शहीद वटे यांच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्र यांनी दिली.

मराठा इंफन्ट्री रेजिमेंट २४ बटालियन मंगळवारी (दि.22) जम्मू येथील नौशेरा सीमेवर अतिरेक्यांवर कारवाई करत असताना सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांना वीरमरण आले आहे. शहीद सुनिल वलटे यांच्यामागे त्यांची पत्नी मंगल वलटे, मुलगी श्रध्दा (वय १४), मुलगा वेदांत (वय ६), वडील रावसाहेब, आई सुशिला, भाऊ अनिल असा परिवार आहे. सुभेदार सुनील वटे यांच्या वृत्ताने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.