गाझियाबाद – भारतात अनेक धर्मांचे वेगवेगळे मंदिरे आहेत. या मंदिरांची संख्या अगणित आहे. मात्र, उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद या शहरात पहिले शहीद मंदिर निर्माण होत आहे. येथील बालनाथ आश्रम परिसरात या मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची या मंदिरात रोज पूजा करण्यात येणार आहे. याद्वारे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा सन्मान केला जाऊन त्यांना ईश्वराच्या स्थानी ठेवण्यात येणार आहे.
शहीद मंदिर निर्माणासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टचे संचालक 75 वर्षीय संन्यासी स्वामी बालनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे.