किंग्सस्टन : टी२० क्रिकेटमध्ये वर्चस्व राखण्याची शर्यत आणखीनच रोमांचक बनली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल यांच्यात एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा लागली आहे. कधी रोहित तर कधी गुप्टिल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरतो. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गुप्टिलने रोहित शर्माला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.
सोमवारी वेस्टइंडीज विरुद्ध गुप्टिलने १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या. गुप्टिलने आपल्या छोट्या खेळीदरम्यान एक खास विश्वविक्रम आपल्या नावावर केला. गुप्टिल हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. गप्टिलने आतापर्यंत १२१ सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ३४९७ धावा आहेत.
यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माही त्याच्यापेक्षा मागे नाही, त्याच्या नावावर ३४८७ धावा आहेत. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी मार्टिन गप्टिल आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सातत्याने स्पर्धा रंगत आहे. यावेळी गुप्टिलने रोहितला मागे टाकले, पण आगामी आशिया कप २०२२ मध्ये हा विक्रम पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नावावर होऊ शकतो. रोहित मार्टिनपेक्षा केवळ 11 धावांनी मागे आहे. मार्टिन गुप्टिल सध्या ३४९७ धावांसह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा ३४८७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने ३३०८ धावा केल्या आहेत.