मार्टिन गुप्टीलचे केवळ 35 चेंडूत शतक

नॉर्थमटन – इंग्लंड येथिल स्थानिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने आक्रमक खेळी करत 35 चेंडूत शतक झळकावले. वूस्टरशायर संघाकडून खेळत असताना गुप्टील 38 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर वूस्टरशायर संघाने नॉर्थमटनशायरवर 9 गडी राखून मात केली. वूस्टरशायर संघाला सामना जिंकण्यासाठी 188 धावांचे आव्हान देण्यात आले होते.

गुप्टीलने आपला सलामीचा साथीदार जो क्‍लार्कसोबत पॉवरप्लेच्या षटकांमध्ये तब्बल 97 धावा कुटल्या. तर पहिल्या 10 षटकांमध्येच वूस्टरशायरने 162 धावांपर्यंत मजल मारली होती. गुप्टीलची आक्रमक खेळी पाहता तो नाबाद राहून संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच, ग्लेसनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. मात्र, यानंतर जो क्‍लार्कने ट्रॅविस हेडच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. क्‍लार्कनेही 61 धावांची अर्धशतकी खेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मार्टिन चौथ्या स्थानावर
या विक्रमाने मार्टिन गुप्टील जलद शतकवीरांच्या यादीत संयुक्‍तपणे चौथ्या क्रमांकावर बसला आहे. या यादीत 30 चेंडूत शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऋषभ पंतचा क्रमांक लागतो. त्याने 32 चेंडूत शतक मारले आहे. 34 चेंडूत शतक करणारा सायमंडस तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर डेव्हीड मिलर, रोहित शर्मा, वॅन डर वेस्टथुयिजन यांच्यासोबत मार्टिन गुप्टील चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)