नवी दिल्ली – आगामी १५ वर्षे मंगळग्रह पृथ्वीच्या जास्त जवळ राहणार असल्याने या लालभडक ग्रहाचे रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी दर्शन होणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आकाश निरभ्र असेल तर या लाल ग्रहाचे दर्शन घेण्याची पर्वणी साधता येणार आहे.
नासाने दिलेल्या दिलेल्या माहितीप्रमाणे मंगळ ग्रहाची ग्रहाची कक्षा पृथ्वीपासून सर्वात जवळ म्हणजे ६ कोटी २० लाख किलोमीटर अंतरावर असणार आहे.
संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात खगोलप्रेमींना मंगळाचे स्पष्ट दर्शन घडू शकते ऑक्टोबर महिन्यांनंतर मंगल आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरताना त्यांच्या कक्षा एकमेकांपासून दूर जाऊ लागल्या कि मंगळाचे दर्शन थोडे अस्पष्ट होऊ लागेल अशी माहितीही नासाने आपल्या अवकाशदर्शनच्या मार्गदर्शक पुस्तिकेत दिली आहे.